Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Dinesh Kamble

Tragedy

3  

Dinesh Kamble

Tragedy

मी कामगार

मी कामगार

1 min
11.9K


मी शेतात राबतो 

मी आॅफीसात राबतो 

मी भोंगा देणाऱ्या गिरणीत राबतो 

मी जन्मभर नुसताच राबतो 

होय मी कामगार आहे 


मी आणि महत्त्वाचा

पण दुर्लक्षित घटक या समाजाचा 

मी कचरा वेचतो 

मी घंटाजगाडी ओढतो 

मी पाट्या वाहतो 

होय मी कामगार आहे 


मी हमाली करतो

डोक्यावर भार वाहतो

ओझ्याखाली कधीकधी 

मुरगाळली जाते मान

पण दु:खाला करावे लागते अजाण 

होय मी कामगार आहे


मी गटारी साफ करतो

मी मैला डोक्यावर वाहतो

मी विषारी वातावरणात काम करतो

आणि कोठल्यातरी असाध्य

आजाराने शहराच्या कोपऱ्यात मरतो

होय मी कामगार...


Rate this content
Log in