Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Gaurav Daware

Comedy Drama Action

3  

Gaurav Daware

Comedy Drama Action

मायी बायको

मायी बायको

4 mins
321


माया बायकोची कविता लयच भारी

मले समजत नाही पण वा वा करतो थोडतरी

नाहीतर देती ती लाथा कंबरेवरी

कित्येकदा कंबर सुजवून मी फिरलो घरभरी 

म्हणून म्हणतो,

माया बायकोची कविता खरच लय भारी.


त्या दिवशी म्हटलं तुयी कविता नाही थोडीबरी

समजत नाही अक्षर अन वाटत नाही खरी

लग्नाआधी तु लिहायची कविता एकदम भारी 

पण आता तुयी कविता वाचून वाटे तु मले मारी 


बायको थोडी हसून आतल्या खोलीत गेली

आणला एक बांबू अन एक थैली

मले वाटल आता हे मले मारते जीवाणीशी

थैलीत भरून मायी लाश फेकून देईल काशी


पण तिनं ढुंसू ढुंसू हानल मले कसबस

काय काय सुजल अन काय सांगू जास्त

आज मले कवितेची किम्मत कळाली

माय गाल पाहून वाटे मी लावलीय थोडी लाली


तिनं जशी मारली माया पाठीवर भुक्की

तेव्हा म्या ठरवलं आता करेल इचीच भक्ती

रोज करेल पूजा सकाळ दुपार रात्री

घेऊन जाईल वारीला बनून एक यात्री


नंतर तिनं माया कंबरड्यात लाथ घातली

मले मारासाठी तिनं माया प्रत्येक भागाले वाटली

त्या दिवशी माया बायकोची होती खरी खुरी सटकली

खरच मायी बायको होती जॅकी चॅन अन जेटली 


एके दिवशी मी गर्मीन हलतडुलत घरी आलो

तिले वाटलं मी जणू दारून पिऊन न्हालो

त्या दिवशी तिने मले लाथान मारलं पूर्ण मापून 

आजही तिच्या चपलेचा नंबर हाय कंबरेवर छापून


मायी बायको हाय खरी पहिलवान भारी

मी मात्र हाय काडीपैहलवान चिरकूटधारी 

मले मारले काढते तिच्या आजोबाच्या तलवारी

त्या भीतीन मी कित्येकदा लपतो सज्जावरी


मायी बायको हाय माया दुश्मणाची बाप

मी घरी येताच मले मारून करते साफ

मारून मारून काढला त्या दिवशी जीवाचा ताप 

म्या घरात सरपटत होतो जणू बेडूक अन साप 


एकवेळा त अजबच घडलं माया घरी

मी माया मित्राले बोलवलं माया घरी जेवणावरी 

त्या दिवशी तिन घसाल लावले मले भांडे रात्रभरी

तेव्हा म्या ठरवलं जास्त मित्र हाय बेकारी


मायी बायको म्हणजे हाय डोक्याले ताप

तिच्याशी लग्न करून मले होतोय पच्छाताप

काल मले कराले लावले तिनं भांडे सगळे साफ

खरकटे भांडे पाहून वाटे बाप रे बाप


कधी कधी बनते ते खरी सावकारी

माया पॉकेटातले पैसे खर्चते भराभरी

माया हातात कटोर देऊन बनवते भिकारी 

तिच्या या खर्चापाई मी झालोय कर्जदारी


मार्केट मध्ये जाताना ते मेकअप चा डब्बा लावी

मले मात्र कंगवा बी घेऊ नाही देई

काल वाटलं इले चाकून कराव खतम

घेऊन मोकळा श्वास घ्यावा थोडा दम


पण मंग आला विचार मायी बायको हाय भारी

चुकून चाकू नाही लागला तर मी जाईल स्वर्गवारी

तिनं कंबरेवर दिल्या लाथा त मी होईल भिकारी

मी हाय काडीपाहिलवान अन बायको ताकदवान सारी 


माया बायकोची बुद्धी आहे मात्र भरपूर

मी परक्या बाईकड पायल तर लक्ष देते ते पुरेपूर

तसा मी बी हाय बुद्धीन शूरवूर

पण ते समोर येताच मायी हालत होते चक्काचूर


जेव्हा ते करते मले लई लई कुरकुर

तेव्हा म्या तेथून निघून जातो पटकन न भुरभूर

पण ते माये लफडे पकडे सुरसूर

तेव्हा मात्र हवा निघून जाते मायी टूरटूर


थोड तिच चुकलं तरी मीच म्हणतो सॉरी

काय करणार राव, माया बायकोची बातच न्यारी

आपण चुका काढल्या तर भेटतात लाथा कंबरेवरी

त्यापेक्षा होऊन जातो मी तिच्या चुकीचा पुढारी


खाण्याच्या बाबतीत ती हाय भुक्कड भारी

मले अर्धी पोळी देऊन बाकी संपवते ती जाडी 

अन मले म्हणते अजून खाशीन कुठवरी

खरच मायी बायकोची काही बातच न्यारी 


कधी कधी मला स्वप्न पडत भयानक भारी

मायी बायको येतो बनून राक्षस जटाधारी

स्वप्नातही मले सूतवते बनून ललकारी

मी लाथा खातो बनून नवरा शानदारी


माया बायकोच प्रेम तिच्या लाथामध्ये दिसत

काय सांगू जास्त माय काय काय सुजत

आता तिच प्रेम फक्त माया कंबरेवर रुजत

मलेबी आता तिच्याचसारखं पैहलवान होऊ वाटत 


माया बायकोची हाय कमाल भारी

दिसते नाजूक पण भुक्कड सारी

शब्द तिचे जणू हाय जुन्या तलवारी

मीही चुकून झालोय आता तिचाच कैवारी


मी सकाळी उठून करतो व्यायाम थोडातरी

पण मायी बायको झोपले हाय वस्ताद सारी

खाऊन खाऊन शरीर फुगवून रायली ती बरी

अन घरचे तांदूळ लवकर संपले असा दोष मले करी


म्या हाय बिचारा एका चिरकूट धारी

थोडं फार खातो तेही तिले वाटत नाही बरी

नशिबानं मी आता झालोय लाचारी

वाटत आता घ्यावं हातात चाकू अन ठुसून तिले मारी


म्हणून मले एकदा सुचली एक कल्पना भारी

झहर देऊन मरावं यासाठी मी केली तयारी

मार्केटातुन आणलं थोडं झहर अन थोडया खारी

चहात टाकून झहर तिले पोहोचवतो नरकावरी 


काही क्षणात पिली ती चार कप चहा सारी

ढुंसू ढुंसू खाल्या तिनं भिस्कीट अन खारी

मी वाट पाहत रायलो ते मरण कधीतरी

पण एवढं झहर पिऊन ते फक्त ढेकर बाहेर सोडी


तेव्हा मले वाटलं मायी बायको हाय अदभूत अवतारी

झहर पिऊनही ही बह्याड हाय ठणठणीत बरी

त्या दिवस पासुन म्या मानलं तिले देव देवधारी

कराले लागलो तिची पूजा रात्र दिवसभरी


तरी मायासाठी मायी बायको मोलाची हजार

तिच्यासाठी होतो माया जीव आरपार

ते हाय खरी माया हृदयाची तलवार

तिच्या आनंदासाठी कंबरेवर लाथा खाईल वारंवार


ती हाय खारी माया लिखाणाची शाई

तिच्याशिवाय माया कोणत्याच शब्दाले किम्मत नाई 

ती कितीही झगडली तरी मी आयुष्य तिच्यावरच वाही 

तिच्या आनंदासाठी माया मनात नसतं दुसरं काही


आता कवितेच्या शेवटी मले चांगलंच लिहावं लागणार

कारण वाचली तिनं कविता तर ते मले नाही सोडणार

कोपच्यात घेऊन मले ते लई लई मारणार

अन तिच्या लाथा खान मले आता नाही जमणार

तिच्या लाथा खान मले आता नाही जमणार.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy