STORYMIRROR

Pratibha Tarabadkar

Drama

3  

Pratibha Tarabadkar

Drama

माणसांचं बेट

माणसांचं बेट

1 min
335

 माणसांची साऱ्या अवघी झाली होती बेटं

 प्रत्येकाला मग बरं वाटू लागलं एकटं

 बोलावं काही तर वेगळाच निघतसे अर्थ

 वाटे कोणाला टीका तर दिसे कोणा स्वार्थ

 कसं वागावं तेच कळेना अन् तुझं माझं जमेना

 प्रत्येकाचंच जग वेगळं मोबाईल वाचून करमेना

 घालून घेतले प्रत्येकाने स्वतःभोवती कुंपण

 द्वार मनाचे बंद करुनिया घातले होते लिंपण

 अडत नाही कोणावाचून मारीत होते गमजा

 बजावित श्रेष्ठ मीच आहे हे तुम्ही समजा

 आहे चालून आली संधी कोरोना हसला मनात

 जिथे तिथे मग घुसू लागला मयतात अन् लग्नात

 उडू लागला जिकडे तिकडे सर्वत्र हाहाकार

 कोरोनाने सुरु केला जेव्हा स्वाहाकार

 माणसाचा अहंकार तो गेला क्षणात गळून

 गडबडून तो गेला कळेना कुठे जावे पळून

 घालुनि भिंती स्वतः भोवती करुनि घेतले बंदिस्त

 राहिली आता केवळ भक्ती अन् देवावरती भिस्त

 क्षूद्र जिवाणू दाखवी मानवा पृथ्वीवरील त्याची जागा

 कळून न आले ज्यास अजूनि तोच खरा अभागा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama