माणसाला माणसात आणले
माणसाला माणसात आणले
भीमाच्या नावाने माझ्या
देश ओळखला जात आहे
चार रंगी ध्वजावर देशाच्या
सम्राट अशोकाचे धम्मचक्र आहे
देवून धम्म आम्हा
माणसात त्याने आणले
माणसात आणून आम्हा
उध्दारली कोटी कुळे
सुटाबुटात राहून नेहमी
विचार उदात्त आमचे केले
धम्म आचारतो आम्ही
अत्त दिप भव आम्हा केले
संघर्षमय लढा असा
समाजासाठी जीवन वेचले
रक्ता रक्तात भीम आमचा
माणसाला माणसात आणले
