माझ्यातला माणूस
माझ्यातला माणूस
यंत्रावत पाने पलटतो
चाळतांना वर्तमानपत्र
डोळ्याखालून घालतो
अक्षरे पाना पानावरली....
लाल, हिरवा, पिवळा अन् निळा
बातम्यांना ही आता रंग असतो
काळीच असली अक्षरे पहा तरी
वाचताना चेहऱ्याचे रंग बदलती....
चोरी, खून, लुटमार, बलात्कार
फसवणूक, आत्महत्या पानोपानी
जणू रोजचेच ते मडे झालेले सारे
पानावत नाही कड या डोळ्यांची....
आकड्यांचा खेळ मांडतो
अपघातात किती मेले, जखमी
भावना साऱ्या गोठल्या आता
गळचेपी झाली माणूसकीची.....
रद्दी विकण्यासाठी ठेवी
वर्तमानपत्रा घालुन घडी
आहे कधीचाच मेलेला
माझ्यातला माणूस पाही......
