STORYMIRROR

Sachin Jagtap

Children Others Inspirational

3  

Sachin Jagtap

Children Others Inspirational

माझी माय

माझी माय

1 min
16.2K


 

आई तुझ्या वात्सल्याचा

कसा होऊ उतराई

तुझ्या माया ममतेला

या जगी तोड नाही

वाटते तुझ्या उदरातले

ते क्षण आठवायला हवे

नऊ महीन्यातले कष्ट तुझे

जे द्दयायचे रोज आयुष्य नवे

कळल्या असत्या त्या यातना

तर बरेच झाले असते आई

डोळयासमोरचे कष्ट तुझे

तू कधी कळूच दिले नाही

आमच्या भल्यासाठी तू

नशीबाशी भांडायचीस

आमच्या उज्वल यशाची स्वप्ने

बाबांसमोर एकांती मांडायचीस

शिवणकाम करता करता

बाबा मान पाठ झिजवायचा

फाटक्या नशिबाला आपल्या

मजबुरीने ठिगळं शिवायचा

काज बटणं करता करता

तुझ्या बोटांची चाळणी होई

तू पदराआड आसवं टिपून

भाग्य आमचे घडवत राही

आई तुझ्या डोक्यावर

अजुनही पडके छप्पर

मी मात्र स्वार्थीच ना

गाठले मोठे शहर

या मोठ्या शहरातही

सुख ते मिळत नाही

खरं सांगतो आई अजुनही

गणित जीवनाचे जुळत नाही

तुझ्या प्रेमाला पोरका मी

दिस टळता टळत नाही

सुख समाधान मिळेलही

पण आई तू मिळत नाही

तुझ्या स्वप्नांच्या चिंध्याही

मला जोडता न याव्या

यापेक्षा मोठा गुन्हा काय ?

मी नशिबाची अन् माझी

वाट बघते माझी माय

 

नाशिक

दि .१४ / ५ / १७ मातृदिन


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children