STORYMIRROR

Sachin Jagtap

Others

2.3  

Sachin Jagtap

Others

तूच माझी लेक लाडकी

तूच माझी लेक लाडकी

1 min
22.6K


चिमणं माझं पाखरू

घरटी माझ्या रूजलं

कधी गाली हसलं

कधी आंम्हावर रुसलं

हाताच्या हिंदोळ्यावर

कधी अंगाईने निजलं

घरभर रांगतांना तीनं

भातुकलीचं दुकान थाटलं

बोबडं-बोबडं बोलतांना

कळलं ना वरिस बितलं

खेळत्या-खुळत्या चिमणीला

चिऊ काऊच्या शाळेत घातलं

यशस्वी झाली कॉलेजात

तेव्हा धन्य-धन्य वाटलं

करिअर सुरु झालं अन् 

तीच्या लग्नाचं दुकान थाटलं

खरं सांगतो त्या दिसानंतर

काळजावीन शरीर माझं गोठलं

पोरापेक्षा पोरीची माया न्यारी

त्या दिवशी मनोमन पटलं

तूच माझी लाडाची लेक

तूझ्याविना अधुरं माझं खटलं.

 

 


Rate this content
Log in