आरती बायकोश्वरीची
आरती बायकोश्वरीची
1 min
13.5K
जयदेवी जयदेवी जय बायकोश्वरी
शरण आलो तुला राहूदे शांततेत घरी ॥ धृ॥
अवघ्या जगतामध्ये तुजजैसी नाही
शब्दशरांनी मज सदैव छळत राही॥१॥
राग रूसवा रूपे शस्त्रे धारी
पति आनंदा सदैव संहारी ॥२॥
सासू सासरे, दीर नणंदरूपे त्रयस्थ न यावा
आल्यास पतिराजाने अबोला प्रसाद खावा ॥३॥
सदैव आवडे तुज माहेरची सृष्टी
सासच्यांवरही असू दे थोडी कृपादृष्टी॥४॥
माझ्या घरी असावा देवी तुझा सदैव वास
बाकी काही नाही तुझ्या प्रेमाची आस ॥५॥
सदा सर्वदा संसारास्तव झटते तुच
म्हणूनच या दासा तुझे अप्रूप ॥६॥
