STORYMIRROR

Sachin Jagtap

Others

3  

Sachin Jagtap

Others

दगडामधलं काळीज

दगडामधलं काळीज

1 min
14.4K


दगडामधलं काळीज तुझं दगडामधी ठेव॥ ध्रु ॥

करणी बिरणी भानामतीचं मला नं वाटे भेव

माणसा मधल्या मानुसकीतच मला  रं दिसे देव ॥ १॥

मंतरलेल पाणी  बाबा तुझं रं तुझ्या जवळच ठेव

दीन दुखिंच्या आसवांतच मला  रं दिसे देव॥२॥

भूत, पिशाच्च, झाड, हडळ ही तुझेच उठवलेले पेव

मानसरुग्णांच्या सेवा भावनेतच मला रं दिसे देव ॥३ ॥

गळ टोचणे, कंकू काढण्याचे तुलाच असु दे चेव

कूंकू स्त्रीचे रक्षिण्यातच मला रं दिसे देव॥४ ॥

नजर लागणे, दृष्ट काढणे ही तुझ्या घाण्याची शेव

दिव्यांगांचा आधार होण्यातच मला रं दिसे देव॥५ ॥

देव असे रे, देवाचे देवत्व जाणण्याचे जाणिव उरी ठेव

निसर्गाच्या नित्य किमयेतच मला रं दिसे देव ॥६॥ 

 


Rate this content
Log in