" अफेयर "
" अफेयर "
1 min
6
ती नेहमी माझ्या बरोबरच असते
तीचे नी माझे नातेच असे आहे
जन्मो जन्मीचे जणू गीत आहे
माझे अस्थित्वाची जाणिव ती आहे
माझ्या जगण्याची उणीव ती आहे
मी म्हणजे च ती आहे
ती म्हणजेच मी आहे
तीचा नी माझा रंग वेगळा आहे
तीचा मात्र रंग एक आहे
माझा जन्म हा च तीचा जन्म आहे
तीचा नी माझा मृत्यु मात्र एक आहे
दोघांत अंतर मात्र एक आहे
तीचे नी माझे मात्र एक्सट्रा
मॅरिटल अफेयर आहे
***************
श्री. काकळीज विलास यादवराव (नांदगाव )
