भातुकली
भातुकली
मिळता वेळ
खेळूया खेळ
भातुकलीचा
बसला मेळ...||१||
एकत्र मन
हर्षित तन
करण्या सण
जमले जन... ||२||
रंगला सखा
सोहळा देखा
अत्यानंदाचा
मिलाप चाखा ... ||३||
सजली फुले
जमली मुले
आंब्याचे दारी
तोरण झुले... ||४||
नव कपडे
चोळी लुगडे
तोंडी गोडाचे
मधु तुकडे... ||५||
लागता लग्न
सर्वच मग्न
खादाडी करी
सर्वच भग्न... ||६||
काढीत दंत
सोहळा अंत
बालखेळाचा
मोह अनंत... ||७||
सौ. शीतल ईशी
मनस्वी कलाकार
