मेघमाला मनीच्या
मेघमाला मनीच्या
मेघमाला दाटल्या नभी
भाव उमले मनी
लपंडाव हा आसवांचा
जागे पहा नयनी...... ||१||
सरसर श्रावणधारा
पडती भूमीवरी
शीळ घालतो थंड वारा
प्रत्येक पानांवरी ...... ||२||
मिलना आसुसली नदी
अल्लड खोडकर
अविरत धावे सरिता
मोही हा रत्नाकर ...... ||३||
सैरभैर वेडे मन हे
दाटूनी येतो कंठ
विचार चक्र चालती ही
स्वप्नी चित्त आकंठ...... ||४||
कर वर्षाव तो सरींचा
अश्रू नेत्री दाटती
सरसर अश्रूधारास
द्यावयाची वाट ती...... ||५||
हळव्या आठवणी वाहे
ह्या पहा डोळ्यातूनी
नकळत जाती तुझ्यात
हळूच मिसळूनी...... ||६||
सौ. शीतल ईशी
(मनस्वी कलाकार)
