पुस्तक सखा
पुस्तक सखा
पुस्तक सखा
करीत वाचन
देई ज्ञानदान
गुरुच देखा ||1||
शब्द सुचले
शब्दास रचूनी
वाक्यात गुंफुनी
गीत फुलले ||2||
भाव लेखका
अवगत असे
मनावर ठसे
सदा वाचका ||3||
शब्दांचा खेळ
उघडीत मना
घडवी जीवना
तो ताळमेळ ||4||
करी लिखाणा
धरुनी आग्रह
पुस्तक संग्रह
सदा वाचना ||5||
वाचू पुस्तक
बनूया चिंतक
नमवू मस्तक
जगू पुस्तक ||6||
©️सौ. शीतल ईशी
(मनस्वी कलाकार)
