STORYMIRROR

Sheetal Ishi

Children Stories Inspirational Others

3  

Sheetal Ishi

Children Stories Inspirational Others

जाणता राजा

जाणता राजा

1 min
144


जन्मला शिवबा शिवनेरीवरी

घेऊनी स्वराज्याची तळमळ उरी

घडवला जिजाऊने हा राजपुत्र

दिले हाती स्वराज्यासाठीचे सूत्र ||१||


शब्द तोकडे वर्णाया शिवबाची महती

ईशस्वरूप हे माझे छत्रपती

खरोखर होता जाणता राजा

प्रयत्न सदा सुखी ठेवण्या प्रजा ||२||


मानी परस्त्री मातेसमान

करी स्त्रीचा सदैव हा सन्मान

असा हा आचारवंत पुण्यवंत राजा

सदैव धर्मनिरपेक्षितेचा गाजावाजा ||३||


जाण त्यास गोरगरिबांची

संरक्षित केले जन सकळची

जरबीने संहारीले कैक दुष्टांसी

गनिमीकाव्याने जिंकले गडकिल्ल्यांसी ||४||


मावळ्यांप्रति सदा मित्र भाव

शत्रूचा सहज उधळती डाव

नि:पक्षपातीपणे न्याय देती क्रमवार

अश्या या छत्रपतीस मुजरा त्रिवार ||५||


सौ. शीतल ईशी 

मनस्वी कलाकार


Rate this content
Log in