सुर्योदय
सुर्योदय
सूर्य हा एक गुरुच आहे. रोज होणारा सूर्योदय सर्वांसाठी एक नवीन आशेचा किरण, उत्साह, आनंद घेऊन येत असतो. सर्वांना एक नवीन शिकवण देत असतो.
झाली सूर्योदयाची वेळ
अवतरला रंगांचा खेळ
सवे खगांच्या संगीताचा मेळ
फिटले पहा अंधाराचे जाळे
झाले सारे आभाळ सोनेरी
मिळाली पृथ्वीला उष्ण किनारी
होई ऋतूत बदल चातुर्मासावरी
देई सर्वांस जीवदान खरी
सर्वत्र किरणांचा छडा
अंगणात प्राजक्ताचा सडा
न जाऊ देता आयुष्यात तडा
घेऊ जीवनाचा नवा धडा
एक नवी पहाट
दैनंदिन जीवनाची रहाट
मिळवण्या हाता-तोंडाचा घाट
चाले मानव कर्तबगारीचा थाट
प्रत्येकासाठी नवा ध्यास
कुणा एकवेळ भाकरीची आस
कुणा विश्वविक्रम गाजवायचा ध्यास
कुणा जगणे म्हणजे फास
बहरू दे नवचैतन्याचे तारे
चमकतील यशाचे निखारे
दूर होऊ दे नैराश्याचे वारे
होऊ देत जीवन दैदिप्यमान सारे
होतोय एकेक दिवसाचा ह्रास
धर ध्येयाची कास
होईल तुज थोडा त्रास
पण मिळेल यशाचे फळ खास
सौ. शीतल ईशी
(मनस्वी कलाकार)
