बाप्पा
बाप्पा
बाप्पा येण्याचे वेध मला लागले
बाप्पाला घडवण्याची स्वप्न मनी जागले
कोणत्या स्वरूपात तुला मी घरात आणू
दहा दिवसात तुझा महिमा कसा जाणू
उठता बसता तुला घडवण्याचा लागला मला ध्यास
तुझ्या सेवेची लागली मनी माझ्या आस
बनवेल मोदक तुझ्यासाठी अनेक खास
उठता बसता सर्वत्र तुझा होतोय भास
हळूहळू तू आकारा आलास
शिवाजीच्या रूपात स्थानापन्न झालास
किल्ल्याची आरास तुला का भावली
रोज तुझ्या सेवेची आस मनी जागली.
रोज आरती साठी जमू लागला मेळावा
फक्त दहा दिवसात गणू कसा कळावा
आवडीच्या आहेत तुझ्या रे दुर्वा
करतोस तू सर्व भक्तांची पर्वा
विशाल तुझे पोट अपराध पोटात घेण्या
सुपा सारखे कान आमची गाऱ्हाणे ऐकण्या
मोदकांवर मारला आहेस तू ताव
सर्वांच्या मनाचा घेतलाय ठाव
परतीची आली तुझी वेळ
मनी चाललाय भावनांचा खेळ
कायमचा राह ना बाप्पा तू घरी
लाड तुझे करीन मी अविरत पुरी
