माझी आई माझी शान
माझी आई माझी शान
गुरू माझी निरंतर
प्रेमळ असे अंतर
सुगरण ती साकार
आदर्श माता माझी ॥१॥
केले मातांना साक्षर
बचतीचा साक्षात्कार
महिलांना हो सादर
तिचा होता जागर॥२॥
संस्काराचा ती आगर
नात्यांचा गुंफी हो हार
सुजाण शिक्षित नार
माऊली माझी जाण॥३॥
माझी आई माझी शान
सावंताचा अभिमान
शब्द अपूरे तू जाण
दिपासम प्रकाश ॥४॥
