कुटूंब दिन
कुटूंब दिन
काळ मागे सरकला
दूर ती माणसे गेली
मोठी कुटूंबेच सारी
काळा मागे कोणी नेली ?
सुख होते , मोद होता
पैसा नव्हंताच मोठा
भेदभाव सान थोर
माज पैशाचा न खोटा ...
सारी एकत्रची होती
नसे कधी दुजे नाव
मोठा कुटूंब प्रमुख
सारे देती त्याला भाव...
आई संस्काराचे धन
बाप शिस्तीचे पालन
वेचलेच तेच कण
नसे पापास क्षालन ...
मज होता अभिमान
अशा माझ्या कुटूंबाचा
क्षण एकेक वेचला
प्रेमभाव व सौख्याचा ...