तुळशी विवाह
तुळशी विवाह
कार्तिक मास
तुळशीचे लग्न
होऊया सलग्न
आनंद खास ... १
घालू अंगणी
सडा सारवण
दाराला तोरण
बांधूया क्षणी ... २
वृंदावनात
तुळस सजली
हळूच लाजली
कृष्ण मनात ... ३
वाटू अक्षता
मंडळी जमली
आतुर जाहली
मनी स्निग्घता... ४
मंगल स्वर
अंगणी घुमला
दिशात फिरला
आनंदी घर ... ५
मुहूर्त आला
वाजले चौघडे
पुष्पवृष्टी सडे
वर्षाव झाला ... ६