कुंटुब
कुंटुब
माझ्या कुंटुबात रहातात
ज्ञान, गुण अन् गोविंद
ताळमेळ बसला अमुचा
सतत वातवरण आनंदकंद........
आईबाबा भाऊबहिण
करतात तर्क अन् वितर्क
पण फळ निघते गोड
होत असु आम्ही सतर्क......
प्रेम,माया वसे दिनरात
अंखड जळे प्रेम वात
मनातले जळमटे पळती
प्रितिच्या वाऱ्याने वनात.....
आमच्या कुंटुबात राहती
हळद,मिरची,लसुन,आले
वरुन मसाल्याचा सुगंध
कांदा,पालक दारी हिंदोळे.......
हळुवार जपुनी वागती
आत्या,मावशीची जोडी
काका काकू मामा मामी
मारित असे रोज चौकडी........
