कृष्ण सखा
कृष्ण सखा
प्रत्येकाच्या मनांमनांत वसतो,
तो कृष्ण जरी वेगळा,
रंग परी त्याचा एक तो प्रीतीचा.
आजं ही वेडी होते राधा,
सूर तेचं छेडिता.
प्रीत जीवापाडं जपताना आजं ही ,
सावळ्या च्या रंगात ती रंगते.
कधी पावसांत उमटलेल्या,
त्या पाऊलखुणांत ती कृष्ण तिचा शोधते.
होऊन राधा मोरपिसी स्वप्न उरी सजवताना,
रंग लाजरा चेहर्यावर चढतो.
कवितेच्या शब्दांत मला,
माझा कृष्ण सखा भेटतो...

