खोपा
खोपा
इवलीसी ती माझी चोच
इवलासा तो जीव माझा
गवताची काडी काडी
त्याचा विणला हा खोपा
हिंमत करुन बघ अशी
लटकते कशी फांदीला
वाऱ्याचा तो हेलकावा
जीव लागतो टांगणीला
पक्षी आम्ही सारे
वेगळी आमची तऱ्हा
सुगरण म्हणती सारे
खोपा माझाच चांगला
आपले ते घर असे
प्रिय सदा आपल्याला
नव्या पाखरासाठी
संसार हा मांडला
