काय हवे....?
काय हवे....?
काय हवे त्याने
विचारले
अंग अंग
शहारले...
अनुभव
खनपटीस होता
जे मिळेल
ते घ्यायचे...
प्रश्न अचूक
अचानक येता कानी
तोंडचे पळाले
की हो पाणी...
सावरलो
बावरलो
कळलेच
नाही काही...
म्हंटले अस्पष्ट मनात
कुजबुज जणू कानात
काय मागावे
आता दानात...
म्हंटले बाबा
द्यायचे असेल तर
एक वाचक दे
निदान वाचकांत एक भर पडू दे..
तो हसला
मी खजील झालो
म्हणाला बाबा
तेवढे सोडून माग....
मी म्हंटल
सारा जीव एकवटून
दानत नसेल तर
पुन्हा असा भेटू नको...
पुन्हा हसला
आणि काहीही न बोलता
वाचना साठी
आता जातो म्हणाला...
बरे वाटले
लिहिण्याचे सार्थक झाले
जाता जाता
वाचक मिळाला...
कवितेला जे हवं
ते सहज मिळालं
बाबांनो आज माझं
तुमच्यामुळे समाधान झालं...
लिहीत रहा
लिहिलेलं वाचत रहा
वाचका साठी
वाचक बनून सुख वाटत रहा
सुख वाटत रहा.....!!
