STORYMIRROR

Rajesh Sabale

Abstract Others

1  

Rajesh Sabale

Abstract Others

।। का रे पावसा असा ।।

।। का रे पावसा असा ।।

1 min
2.5K


का रे पावसा असा तू, दुहेरी वागतो।

जवा पडायचं नाही, तवा उगाच पडतो।।

कधी ऊन-वाऱ्या संग, नागडा नाचतो।

कधी थेंब-थेंबातून, तळ्यात साचतो।।

 

 कधी एकटाच येतो, नाही कुठं गाजा-वाजा।

कधी वाजंत्री वाजवून, देतो मानवास सजा।।

कधी झाड-वेलीतून, पानी थेंब थेंब झिरपतो।

कधी डोंगर-पायथ्याशी, झऱ्यातून खळाळतो।।

 

 कधी नदी नाल्यातून, पुन्हा सागर भेटतो।

कधी चिखल मातीत, सारं पाणी जिरवितो।।

कधी पेरल्या शेतात, कणीस मोत्याचे भरीती।

कधी पिकल्या शेतातून, सारं पाणी फिरवितो।।

 

कधी ऊन वाऱ्या संगे, उगा मेघा फिरवितो।

कधी घोटभर पाण्यासाठी, रानोमाळ हिंडवितो।।

 कधी नदी-तलाव भरून, देशोधडीला लावतो।

कधी बिना पावसाने पिकं, उभ्या शेतात जाळतो।।

 

 कधी जथे ढगांचे घेऊन, आकाशी मिरवतो।

कधी थेंब ना पाण्याचा, पाणी डोळ्यात आणतो।।

कधी इंद्रधनूच्या मागून, पावसास रोखतो।

कधी धुंद होऊन मेघात, बेधुंद बरसतो।।

 

 कधी उगाच माणसाशी, वेडी आशा दावितो।

कधी धन-धान्य सारे, गाव-गाड्यांनी भरतो।।

कधी एक हाती देतो, अन दुजा हाती नेतो।

कधी झालं गेलं सारं, उघड्या डोळ्यांनी पाहतो।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract