STORYMIRROR

Aruna Garje

Comedy

3  

Aruna Garje

Comedy

इमोजीची गंमत

इमोजीची गंमत

1 min
206

काय सांगू बाई

नेहमी मला घाई

मुलगा माझा म्हणतो

इमोजी टाकावी आई 


टाईप करायला गेले 

बढियाचे बुढिया झाले 

मैत्रिणीची समजूत काढता

माझ्या नाकी नऊ आले 


छान छान म्हणताना

इमोजी तीन टाकते

भारी पटलंच मनाला 

तर अंगठा मी दावते


हात जोडून कधी कधी 

धन्यवाद सुद्धा म्हणते

कधी सॉरी म्हणताना

तसेच हात जोडते


दुःख झाले कधी तर

इमोजी रडकी टाकावी

अती आनंद झाला तर

बत्तीशी मस्त दाखवावी


लहान होऊन कधी कधी 

टाळी उगाच वाजवावी 

स्मित हास्य करण्यासाठी 

हसरी इमोजी टाकावी


इमोजीची ही कसरत

आवडते आताशा मला

कितीही असली घाई

पकडते मी इमोजीला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy