STORYMIRROR

Prashant Shinde

Drama

2  

Prashant Shinde

Drama

हट्टी डोके दुःखी...!

हट्टी डोके दुःखी...!

1 min
14.6K


मला कळत नाही

जेव्हा जेव्हा ती घरी येते

तेव्हा तेव्हा डोके दुःखी

बरोबर कशी घेऊन येते


मांडीवर डोके ठेऊन

बाबा डोके दाबा म्हणते

आणि उगीचच नाहक

आपलं कण्हत असते


हिच्या डोके दुःखीच

अजूनही गणित मला कळलं नाही

डोके दुखीने हिच्या काही

अजूनतरी पाठ सोडली नाही


म्हटल मी तिला एकदा

डोकं जरा कमी वापरत जा

डोक्यालाही केव्हातरी

आराम थोडा देत जा


मला म्हणते माझी लेक

हातात तुमच्या जादू आहे

डोक्याला नुसता हात लागता

डोके दुःखी बघा छुमंतर होत आहे


पटले मला अजून ते बाळ आहे

छुमन्तरची जादू तिला ज्ञात आहे

स्पर्शात तिला सुखावते आहे

म्हणून तर डोके दुःखी डोके वर काढत आहे....!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama