STORYMIRROR

Yogita Takatrao

Inspirational

3  

Yogita Takatrao

Inspirational

हृदय

हृदय

1 min
1.0K



वाईट वाटतं अशी कशी माणसं

अचानक या जगातुन निघून जातात

काय झालं होतं हो?अस कसं झालं ?

कालच तो तर मला भेटला होता

आम्ही भरपूर गप्पा मारल्या होत्या

आणि आज ही वाईट बातमी ऐकून

त्याच्या हीतचिंतकांच्या ,आप्तेष्टांच्या

पाया खालची सरकली जमीन

त्याच्या घरी शोककळा पसरली

हृदयात त्याच्या एक तीव्र कळ आली

आणि त्याचा जिवच घेऊन गेली

आयुष्य होतं तोवर खूपच राबला

जेव्हा कमवलेले ऐश्वर्य उपभोगायचे

तेव्हा तो अवेळीच निघूनही गेला

घेत होता आरोग्याची योग्य ती काळजी

मग कुठे कशी शिंकली होती माशी

नित्य नियमाने चालत फिरत होता

बाकीच्या गोष्टींच काय निर्व्यसनी होता

निमित्त माञ झालं हृदयात झटका येण्याच

आणि त्याच असं एकाएकी जाण्याचं

नियमित रक्त तपासणी करत नव्हता

त्यामुळे कळत नव्हती कोलेस्टेरॉल ची माञा

त्यात कुठले कुठले डायटही करत होता

पण कळल्याच नाहीत रक्तातल्या गुठळ्या

आणि मग हा अभद्र दिवस उजाडला

पोहोचलंच नाही हृदयापर्यंत रक्त त्याच्या

आणि त्या झटक्यात हृदयच त्याचं थांबल

त्या एका क्षणात सारं काही संपलं

त्याची ,स्वप्ने ,ईच्छा, आकांक्षा सारं काही

त्याच्या मागे सगळं अपूर्णच राहिलं

हवा होता तो सगळ्यांनाच घरात

पण नाही ना काहीच त्यावर इलाज

हे पाहून तरी सगळ्यांनी बोध घ्यावा

आपलं आरोग्य आपणचं नीट जपा

कमावलेल वैभव मनसोक्त उपभोगा

काय करावं काय नाही तज्ञांनाच विचारा

आपल्या हृदयाला चिरतरूण ठेवा

नियमित रक्त तपासणी करत रहा

आणि एकदाच मिळालेले जीवन 

बिनधास्त हसत खेळत निरोगी जगा

पूर्ण करा आपल्या सगळ्या इच्छा कारण

हवेच आहात तुम्ही तुमच्या कुटुंबियांना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational