STORYMIRROR

Jyoti gosavi

Comedy Romance

2  

Jyoti gosavi

Comedy Romance

हृदयात कळ बारीकशी

हृदयात कळ बारीकशी

1 min
76

ओलेती थरथरली काया

गंध केसरी फुलारलेला

श्वास धपापे मऊ मुलायम

मंद मोगरा दरवळलेला


अवगंठून ती उभी अंगणी

 धुंद रुपेरी पावसात 

ओलेते ते ओष्ठ पाहूनी

धडधड उठली ह्रदयात


चेहऱ्यावर महिरप केसांची

 ढगातून जणू चंद्र दिसे

 पहाताच त्या मदनिकेला

 पहा लागले मजसी पिसे


साडी चिकटली अंगाला

 उठावदार ती तनू दिसे

वाराही आला रंगाला

 जणू त्यालाही लागले पिसे


मनात माझ्या मोर नाचला

 वाटे विचारावे गूज तिला

एकदा तरी चुंबन घ्यावे

 घट्ट कवळावे कुशीत तिला


हे सुंदरी हुस्न परी 

अप्सरा की उर्वशी

 ओलेत्या संध्याकाळी

 दारी उभी का तू अशी


ती वदली अहो दादा

 येवढा पत्ता सांगा मजशी

 

 दादा शब्द ऐकताना

 हृदयात कळ बारीकशी 

आणि माझ्या स्वप्नांची

 झाली मग काशी काशी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy