Read a tale of endurance, will & a daring fight against Covid. Click here for "The Stalwarts" by Soni Shalini.
Read a tale of endurance, will & a daring fight against Covid. Click here for "The Stalwarts" by Soni Shalini.

Pradnya Ghodke

Classics

4  

Pradnya Ghodke

Classics

गुरू

गुरू

1 min
278


माय-बाप स्वाभिमान,

ज्यांनी जग दाखविले..

गुरू माझा अभिमान,

ज्यांनी मज ज्ञानी केले... १.


मित्र माझे ग्रंथ गुरू,

भरलेला ज्ञान घडा..

त्यांच्यासवे होई पुर्ण,

माझा अज्ञानाचा धडा...! २.


कधी खचे मनोधैर्य,

जेव्हा निराश होऊनी..

हात तयांचा पाठीशी,

तेव्हा आधार बनूनी...! ३.


जीवनार्थ आयुष्याचा,

गुरूमुळे आम्हां कळे..

कसे व्हावे उतराई,

फक्त दोन कर जुळे...! ४.


गुरू ज्ञानाचा निर्झर,

अर्थ सापडे यथार्थ..

काय वर्णावा महिमा,

अशा गुरूस कृतार्थ....! ५.Rate this content
Log in

More marathi poem from Pradnya Ghodke

Similar marathi poem from Classics