शीर्षक :- आनंदाचे क्षण काही...!
शीर्षक :- आनंदाचे क्षण काही...!
कधी वाटते उन्हाला
आज चांदणे भेटले
नाही कसे म्हणावे ते
बरे मलाही वाटले
तुझ्या श्वासांनीच मला
प्राण सोहळे अर्पिले
माझे म्हणून मजला
खरे अस्तित्व कळाले
रण! मानिले सदाच
आयुष्याला भारावले
भास मग फुलांचेही
मला खरेच वाटले
झाड अबोलीचे जणू
अन लाजाळूची फुले
माझ्या मनातही तसे
नवे अंकुर फुटले
साक्ष दे तूच फिरूनी
आनंदाचे क्षण काही
पुन्हा फितुर होतील
क्षण मग प्रेमाचेही
सौ.प्रज्ञा घोडके,पुणे©®
