शीर्षक :- रिक्त होता पानावर
शीर्षक :- रिक्त होता पानावर
जेव्हा मी लिहू लागले कविता
आणि लोकांना कळेल
तेव्हा कुणी म्हणेल वा! छान
'चांगला प्रयत्न' कुणी म्हणेल
कुणी म्हणेल वाढवा व्यासंग
कवितेत भरा वेगवेगळे रंग
पण मला वाटते की
लिहिणे म्हणजे ध्यास,अभ्यास नाही
वाचकांना हे कळतच नाही
असे वाचून कविता होत नाही
प्रत्येक क्षणी मी जगते कविता
तेव्हाच, व्यक्त होता येते
अन् पानावर येते उतरवता..
जेव्हा लोकांच्या सुख-दु:खांशी
समरूप येते होता,
तेव्हाच तयार होते
एक नवीन कविता..
रिक्त होताना पानावर
जणू मी असते पाहत
दिसते मला तेव्हा
कुणा पामराचे दुखः डोळ्यात
माझे दुखः द्रवते
तेव्हा कवितेच्या रुपात......!
सौ.प्रज्ञा घोडके,पुणे©®
