शीर्षक :- देणार्याने देत जावे
शीर्षक :- देणार्याने देत जावे
सत्कर्माचे दान सदा
देणार्याने देत जावे
पुण्याईचे दान घेत
जीवनाचे अर्घ्य द्यावे
सोनस्पर्शी पावलांनी
जाणिवेत उतरावे
अबोधशा नजरेनी
कुणा हृदयी पहावे
मम दृष्टीच्या संगमी
विश्व सारे उतरावे
कधी कोणा बोचू नये
काटे असेच चिंतावे
सल,दु:ख दुसर्यांचे
सारे मज जाणवावे
उरी कोंदण कातळ
पालखीने सजवावे
मागे माझ्या स्मरणांना
कोणी तरी ते पहावे
अन् अलवार त्यांनी
माझे काळीज सांधावे
सौ.प्रज्ञा घोडके,पुणे©®
