शीर्षक:- चंद्र गालात हसला...!
शीर्षक:- चंद्र गालात हसला...!
केव्हा एकदा तिनेच
हसुनीया ताल दिला
मेळ त्या दोन जीवांचा
भाषा खुणेची बोलला
मोहरून अंगांग..अथांग
स्पर्श रोमांचित झाला
समिराशी दंग तेव्हा
होता चाफा थरथरला
तिने घेतले मिटून डोळे
संतृप्त..मध्यरात्रीला
धुंद आवेगात नभी
चंद्र गालात हसला
भरूनी साद ती गोड
पहाटेत गलबला झाला
भर उन्माद सावरताना
उषेत चेहरा लाजलेला
सौ.प्रज्ञा घोडके,पुणे©®
