गुरु महिमा
गुरु महिमा


काव्यप्रकार अष्टाक्षरी
गुरु असे महाज्ञानी
वाखाणावे चातुर्याला
सद्गुणांचीच खाण
वंदनीय जगताला (१)
पूर्वसंचिताने गुरु
शिष्याप्रती लाभतसे
ज्ञानदान परिपूर्ण
पारखूनी करीतसे (२)
विद्यावाचस्पती गुरु
शिस्तप्रिय पित्यापरी
घडवित हिऱ्यासम
माया त्याची परोपरी (३)
आत्मविश्वासाचे बळ
गुरु शिष्याप्रती देई
अंगी विनय बाणवे
उपदेशामृत देई (४)
थोर गुरुमहिमाची
काय शब्दांत वर्णावा!!
कृपा, वरदान लाभे
भाग्यवान तो जाणावा (५)