करु साष्टांग वंदन
करु साष्टांग वंदन
करु साष्टांग वंदन
येत नाही निवेदन
देत नाही आमंत्रण
लाखो वारक-यांना
करु साष्टांग वंदन
आम्ही सारे माळकरी
विठूभक्त वारकरी
चिंता नको धरु उरी
करु आनंदाने वारी
घोष विठ्ठल नामाचा
सवे नाद चिपळ्यांचा
ताल घुमतो टाळांचा
रंग भरतो भक्तीचा
वदे माऊली माऊली
रंगे अभंग नि गाणी
वारु धावतो रिंगणी
चला बघायला झणी
भक्तीरसे नाहूनिया
मनी दाटे समाधान
भाव उरी दाटूनिया
देवा करितो वंदन
युगे युगे चाले वारी
मोद हर्ष मनोमन
हात दोन्ही जोडोनिया
करु साष्टांग वंदन
सौ. मनीषा आवेकर
