रक्षाबंधन
रक्षाबंधन
सण रक्षाबंधनाचा
भाऊ बहीण प्रेमाचा
हर्षोल्हास आनंदाचा
एक धागा रेशमाचा
कर रक्षण तू माझे
येई भगिनी माहेरी
धागा रेशमी मायेचा
नाते जन्मजन्मांतरी
किती वेळ गप्पागोष्टी
सय बाल्याची येतसे
चिंचा बोरे भावासाठी
सदा मागे ठेवतसे
गोडधोड जेवणात
भर हास्यविनोदांची
करी औक्षण भावाला
देवा सुखी ठेव त्यासी
माय ओटी भरीतसे
भाऊ देई भेटवस्तू
राहो सुखाचे माहेर
वास्तू वदते तथास्तु