गुलाबी थंडी ( सहाक्षरी )
गुलाबी थंडी ( सहाक्षरी )
दिवसा गरम
रात्रीचा गारवा
मनी का घुमतो
प्रितीचा पारवा....१
तिन्ही सांजवेळ
तुझी लाडीगोडी
अंधार वाढता
भरे हुडहुडी....२
शाल उबदार
वूुलनस्वेटर
होई उगाचच
नजरा नजर...३
रात्री पांघरून
मिलनाची घडी
हवी हवी वाटे
ही गुलाबी थंडी...४

