STORYMIRROR

Prashant Shinde

Drama

2  

Prashant Shinde

Drama

गटारी....!

गटारी....!

1 min
7.5K


आज अमावस्या । गटारी फटारी ।

पुन्हा ही उधारी । मोक्यावेळी ।।


मित्र परिवार । सगे सोयरेही ।

ते दिसतीलही । गुत्यामध्ये ।।


नमस्कार देवा । त्यांना मी करीन ।

उधारी देईन । त्यांची पण ।।


पण देवा तूच । सांग रे एकदा ।

दिले अनेकदा । प्रेमापोटी ।।


आता कसे मग । मीच का रे देऊ ।

उधारी का पाहू । त्यांची ही रे ।।


नको ही गटारी । मलाही वाटते ।

प्रेमही दाटते । गटारीस ।।


केला मी ही पण । नको ही गटारी ।

म्हणतो मी हरी । पांडुरंगा ।।


पाव रे मलाही । दर्शन नको रे ।

संगत नको रे । आज मला ।।


राहू दे सुखात

। माझ्याच घरात ।

नको रे दारात । कोणी आता ।।


म्हणे पांडुरंग । उठ लवकर ।

फेडी रे उधार । पहिल्यांदा ।।


मग बघ कोणी । नाही रे येणार ।

मागण्या उधार । तुझ्या दारी ।।


फेडली उधारी । सकाळी सकाळी ।

लई यरवाळी । आपसूक ।।


झालो मी मोकळा । देऊन उधारी ।

पहातो शेजारी । अचम्बित ।।


पावे पांडुरंग । सुख हे अपार ।

भरला पदर । तव कृपे ।।


आनंदी आनंद । हा परमानंद ।

खरा स्वानंद । आनंदात ।।


प्रशांत सांगतो । हे कळवळून ।

पहा रे वळून । घराकडे ।।


गटारी फटारी । सब झूट आहे ।

तो सर्व हे पाहे । पांडुरंग ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama