STORYMIRROR

kishor zote

Inspirational

4  

kishor zote

Inspirational

गस्त......

गस्त......

1 min
958


गस्त


डोळ्यात तेल घालून

पहारा असा देतो

नित्यनियमाने मग

सिमेवर गस्त घालतो...१


तीन दले सैन्याची

भूदल आमची शान

हाती शस्त्र संगिनी

त्याचा आम्हा अभिमान.....२


पावसाच्या थैमानात

कमरेवर पुराचे पाणी

तरी शिस्त आमच्यात

उतरलोत जसे या रणी....३


शत्रूंवर वचक ठेवण्या

नित्य असे हा क्रम

भारत देशाच्या रक्षणा

कमीच वाटे हे श्रम....४


पोशाख हा सैनिकी

अंगावर चढतो जेंव्हा

रोमांचित होते तन मन

विरश्री दौडते तेंव्हा.....५


मनी एकच आहे आशा

देशाचे स्वातंत्र्य टिकावे

सिमांचे रक्षण करता

हौतात्म्य नशिबी यावे....६


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational