घेऊन जाना रे
घेऊन जाना रे
आता तरी "घेऊन जाना रे" छळवाद नको
तुझ्या अंतरीची साद मनाला भिडू दे नको
आहेच हा दु:स्वास मनाचे तार तो छेडतो
भास आभास मला आता भासवू तू नको
सरणावर जाताना सडा गुलाबाचा भासला
मरणाची वाट तू रक्ताने माखवून जावू नको
स्वागतासाठीच आज कुत्रे जरी भुंकले होते
रातकिड्यांची आरास तू सजवून ठेवू नको
हाक माझ्या मनाची तुला ती भेटत नव्हती
"घेऊन जाना रे" साद आता तू ऐकू नको
आहे काळोख, अंधार हा दाटला काळजात
माझ्या स्वप्नांची फुले असा तू उधळू नको
खऱ्या खोट्याचा सौदा कधी नव्हताच इथे
राजकारणाचा बाजार सभेत तू मांडू नको
प्रस्तावनाचे फायदे तोटे मी कशाला पाहू
माझ्या अंतराच्या पडद्यांना छेद पाडू नको
मी स्वत:च स्वत: आहे, हार नाही प्रणाली
प्रवासात अडथळे निर्माण असे करू नको
