STORYMIRROR

Aarya S

Comedy Fantasy Children

3  

Aarya S

Comedy Fantasy Children

दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ

दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ

1 min
268

सापडला दोन बोक्यांना

मोठा लोण्याचा गोळा,

दोघांचाही पडला

एकत्रच त्यावर डोळा


म्हणू लागले दोघे ही जण

लोणी आहे माझे,

बघत होते एक माकड

लांबून भांडण त्यांचे


माकडाला पण खायचे होते

ताजे ताजे लोणी,

लोणी बघून तोंडाला त्याच्या

सुटले होते पाणी


भांडू नका शान्त व्हा

रहा जरा चुप्प,

सोडवतो मी भांडण तुमचं, 

बसा जरा गप्प


माकडाने मग जाऊन आणला

कुठून एक तराजू,

तराजूत या घालून

लोणी आपण आता मोजू


घालू लागला लोणी तो

दोन्ही पारड्यां मध्ये,

ज्या ज्या पारडीत जास्त लोणी,

जाई त्याच्या तोंडा मध्ये


बघता बघता अगदी थोडे

लोणी बाकी राहिले,

म्हणतो हे तर माझे

कारण भांडण मी मिटविले


खाऊन टाकले गपकन त्याने

उरले सुरले लोणी,

बघून ते बोक्यांच्या

डोळा आले आता पाणी


जाती दोघे उदास होऊनी

गेला खाऊ त्यांचा,

भांडण करता दोघे

लाभ होत असे तिसऱ्याचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy