धुव्वा उडवला
धुव्वा उडवला
धुव्वा उडवला आफ्रिकेचा
कांगारूंना पाणी पाजले
शर्मा, धवन, कोहली मुळे
देशाचे नाव गाजले
बुमराह भलताच फॉर्मात आहे
तसाच भूवी-पंड्या
विश्वचषकात मातब्बरांच्या
उडवीत चाललेत दांड्या
यष्टीमागून अनुभवी धोनी
सांगतो युक्ती काही
बळी घेतल्याचा आनंद
घुमतो दिशात दाही
कोरणार विश्व चषकावर
भारत आपले नाव
आमच्या मनात जरादेखील
शंका नाहीच राव!
