देवपणाला अजुन आम्ही नाही पोहचल
देवपणाला अजुन आम्ही नाही पोहचल
देवपणाला अजुन आम्ही नाही पोहचलो
वरून शांत देवाच्या मुर्तीसारखे दिसतांना
मनात गोंधळलेल्या विचारांच्या त्सुनामीने
मनशांतीच कधीही, कोणीही, कसेही
न भरून काढु शकणार नुकसान झाले होते!
अजुन स्वतःचे नुकसान न होण्यासाठी
नका फासवुन घ्या कोणाकडुन शेंदुर
अन् खोटेपणाचे देवपण नका मिरवु!
सहजतेने जगताना ओढ असु द्या
जाणुन घेण्या खरा 'देव'पणा!!!
