STORYMIRROR

Sanket Potphode

Drama

4.7  

Sanket Potphode

Drama

दाटले आभाळ काळे

दाटले आभाळ काळे

1 min
14K


दाटले आभाळ काळे
अंधारल्या साऱ्या दिशा
उगवतीचा तो सूर्य माझा
हरवला हा आज का

स्वप्नांची पहाट ही
रात्र झाली काळोखी
वेळ ही कुठली उमजेना
काय झाले सांग ना

हरवले शब्द सारे
मूक झाल्या भावना
मिटलेल्या ह्या साऱ्या पाकळ्या
उलगडू कश्या मी सांग ना

कोडं हे सुटेना
भान हे परतेना
राहिले हे गीत अधुरे
पूर्ण करण्या परत ना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama