चोवीस तासीबॅंड.
चोवीस तासीबॅंड.
चोवीस तासीबॅंड
बाहुल्यावर चढावयाची मला होती हुर-हुर,
मोठ्या उत्साहाने मी लग्नात वाजवला बॅंड.
घोडीवर बसून लग्नमंडपी केले मी पदार्पण,
ते होते माझे पत्नीसाठी कायमचे समर्पण.
बघता बघता बॅंड-बाजाचे सुर मंदावले,
अर्धांगीनीचे सूर हळु-हळु वाढतच गेले.
पत्नीच्या स्वागतात मी नाही ते जाणले,
बघत-बघता तीन-चार वर्ष कसे-बसे काढले.
तीची शैली व सौदऱ्यांचे होते मला वेड,
वेड कायम ठेवण्यासाठी झालो मी वेडा.
सांसरीक जीवनाचा हळु-हळु वाढला वाडा,
मुलांसाठी सारखा पित होतो कटकटीचा काढा.
चोवीस तासीबॅंडचा ताल-सुर झाला बेसुर,
आम्ही झालो मग एक-मेकांसाठी असुर.
दोघांचा कधीच नाही मिळाला मधुर सुर,
फुकटच्या बॅंड निरंतर वाढतच गेला सुर.
एक मेकांना समजून घेण्याचे सांमर्थ संपले,
शेवटी हार मानून मीच संसाराला सावरले.
चोवीसतासी बॅंडचे वर्चस्व सारखे वाढले,
पण माझ्या अपघाताने तीचे मन हरवळले.
जरी तीचा तोंडीबॅंड वाजत असतो लगातार,
तरी तीचे संसाराचे असतात कायम सुखद स्वर.
चार भिंतीच्या आड असते तीची नेहमीच तकरार,
पण तीच जोपासते माझ्या आदार-सत्काराची चिता फार.
