फूलमाळी.
फूलमाळी.
फूलमाळी
तुझे ते बघून टपोर ,काळेभोर प्रेमळ,टटवित डोळे,
माझ्यासाठी जनु निसर्गाने विणलेले मास्याचे कोळे.
त्या कोळयात जनु अटकलो जसा अमर तुरुंगावासी,
तू माझ्या मनाची बनली सात जन्माची तुरुंगांधीकारी
इकडे आड,तिकडे विहीर केवळवाणी दशा माझी,
तुझ्या त्या टपोर ,प्रेमळ,टटवित डोळ्यांनी केली.
माझ्या मनाचे ठोके हृदय गतीच्या पार वाढले,
मग मास्याच्या कोळयातून सुटका कठीण झाली.
तुझे लांब,डाट,काळे आणी चमकदार रेशमी केस,
वाऱ्याच्या झोकाणे उडणारे खुले तुझे मदमस्त केस.
मला करतात निरंतर व्याकुळ आणी बेभान असे,
माझ्या मनाचा तोल सुटतो व होतो कासावीस मी जसे.
तुझ्या रूप रंगाची कशासी करावी मी तुलना,
बागेतील रंग-बिरंगी फुलांच्या जशा मनोहर रांगा.
बागेतील तलावात दिसते जशी फुलांची छाया,
तुझ्या त्या रूप,रंग,केस व डोळ्यांची ती माया.
असामान्य सौंदऱ्यांच्या बघून तुझ्या छटा वेळो-वेळी,
तुझ्या प्रेमात भवऱ्यासारखी अटकण्याची आली पाळी.
तुझ्या या सौन्दर्य शैलीची बनवली मी एकच माळा,
आतुरतेने बघतो तुझीच वाट फक्त हा प्रेमी फूलमाळी.
तुझ्या सारखी मृगनयनी असावी माझी अर्धांगिनी,
तुझा सुगंध भासतो मला जनु जसा मृग कस्तूरी.
तुझ्या प्रेमाची मी घातली आहे आजन्म साकळी,
बनलो आहो तुझ्यासाठी कायमचा मी फूलमाळी.
मला वाटते तुझ्या सौदऱ्यांवर लिहावी मी चारोळी,
अपुरे पडतात मग माझे शब्द व अलंकारीत ओळी.
मी इतका कधी दुर्बल व हतबल नव्हतो एकेकाळी,
तुझ्याचसाठी खर्चावे माझे संपूर्ण जीवन याचकाळी.

