प्रेमाचे वादळ.
प्रेमाचे वादळ.
प्रेमाचे वादळ
तुझाचं गंमतीने,तुझाच जमतीने,
तुझाचं धाड़सीने, तुझ्याच संगतीने.
तुझाच शैलीचे,रुपयांचे व तुझ्याच प्रेरणेने,
तुझ्यावरच लिहावे अमोल जीवनाचे महाकाव्य,
अमर करून दाखवू याकाळी आपलेचं प्रेमकाव्य.
तुझ्याच अभावी वाटते माझे जीवन अपूर्ण,
तुझ्या संगतीने होईलच ते कधीतरी पूर्ण.
अर्धांगीनी शिवाय ते कां भासते अपूर्ण,
तुझ्या अभावामुळे मला झाली जाणं पूर्ण,
मी माझ्या मनांची केली तशी तयारी पूर्ण.
तुझ्याचसाठी करतो मी अफाट प्रयत्न,
तरी तुला कां वाटते अपुरे माझे प्रयत्न.
जर दगडाला घाम सुटतो करून प्रयत्न,
तू तर आहे हाडा-मासी निसर्गाचे रत्न,
तरी दमझाट होतो करून निरंतर प्रयत्न.
या प्रियतमाचा विनाकारण कां होतो छळ,
आपल्या प्रेमाचे उठावे प्रेमजगात वादळ.
असे तुला कां वाटत नाही कधीकाळी,
संधी निघून जाण्याची आली आहे पाळी,
आता तरी एकदा संधी मालाचं मिळावी.

