STORYMIRROR

Dnyaneshwar Bhoyar

Children Others

3  

Dnyaneshwar Bhoyar

Children Others

चिऊचे बाळ

चिऊचे बाळ

1 min
14.5K


एक होती चिऊताई

तिला होती एकच घाई

सकाळ होताच रानात जाई

बाळासाठी चारा नेई ||१||

चिऊताई रानात जाताना

धडा शिकवी बाळांना

बाळ चिऊचे होते छान

ऐकत असे उंचावून मान ||२||

एके दिवशी काय झाले

चिऊताईचे बाळ हट्टी झाले

चिऊला सांगे डोळे ओले

पाहता वाट रडू आले ||३||

चिऊताई म्हणाली बाळांना

बळ येऊ द्या पंखांना

संगे घेऊन जाईल ना

दाने टिपणे शिकवील ना ||४||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children