भावी नगरसेवक
भावी नगरसेवक
निवडणूक जवळ आली की,
भावी नेत्यांचे पाय जमिनीवर न राहती
सरकारी कार्यालयात जाऊन हे,
जनतेच्या अधिकारासाठी गोंधळ घालती
साहेबांची ओळख नाही का तुम्हाला?
आमच्या वार्डात नाही येत कोणी काम करायला
पाच वर्षापासून अशुद्ध पाणी जनतेने पिले,
का हो, अधिकारी साहेब प्रशासन तुमचे झोपी गेले
रस्त्याच्या झालेल्या दूरव्यवस्थेमुळे,
कितीतरी आत्मा परमात्माना मिळाले
तरीसुद्धा अधिकारी साहेब,
तुमचे कार्य नाही जागले
पाच वर्षाच्या दुर्गंधीने त्रस्त झालो,
आम्ही आमच्या कॉलनी मध्ये
जाणीव आहे का हो अधिकारी साहेब तुम्हाला,
तुमच्या AC असलेल्या ऑफिसमध्ये
अधिकारी साहेब आमच्या साहेबांचा आदर्श घ्या जरा,
जनतेतील माय बापांनो आमच्या पक्षाचा हात धरा
बघा तुमच्या समस्या मी कार्यालयात मांडतो,
मीच आहे तुमचा भावी नगरसेवक हे ठामपणे सांगतो
