STORYMIRROR

Sanjay Gurav

Comedy

3  

Sanjay Gurav

Comedy

बायको... एक कोडं

बायको... एक कोडं

1 min
12.1K

जवळ येऊनही उलगडेना अजूनही

बघा बायको नावाचं महाकठीण कोडं

दामटून दामटून दमलो तरी अडतंय

अजूनही संसार नावाचं घरगुती घोडं


सुट्टी म्हणून झोपावे तर उडतो सपकन

तोंडावर पाण्याचा रोज रोज फवारा

लवकर उठले तरी मिळतेच हो धमकी 

कशाला कडमडताय उगा, झोपा की जरा


शर्ट लटकून थकले बनियनची झाली जाळी

एक दिवसाआड येते झाडू मारायची पाळी

घराबाहेर कोरोना, घरी 'हे करोना-ते करोना'

उचल बरे देवा... आता असे जगणे सोसवेना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy